ठळक बातम्या

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हंसराज अहीर यांची नागपुरात भेट; कर्नाटकसोबतच्या ऊर्जा कराराच्या अंमलबजावणीसाठी बैठकीची मागणी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  यांची दि. ७ जून रोजी नागपूर येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते  यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मिळत असलेल्या प्रचंड यशाबद्दल श्री. अहीर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.

    भेटीदरम्यान राज्याच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. सन २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन, कर्नाटकचे ऊर्जामंत्री आणि केपीसीएल (KPCL) यांच्यात झालेल्या कराराची अंमलबजावणी अद्याप प्रलंबित असल्याचे श्री. अहीर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

    या कराराची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच KPCL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी हंसराज अहीर यांनी केली.

    राज्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी आणि दोन्ही राज्यांमधील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी हा विषय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणीची सकारात्मक दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.




    Photo