विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
कोरपना : तालुक्यातील कोडसी (बु.) गावातील ग्रामपंचायत कोंडवाड्यात दि. १ जुलै २०२६ रोजी ७ नग म्हशी जमा करण्यात आल्या आहेत. या म्हशींच्या मालकांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या या म्हशी असतील त्यांनी आवश्यक माहिती व ओळख पटवून ग्रामपंचायत कोडसी (बु.), ता. कोरपना, जि. चंद्रपूर येथे तातडीने संपर्क साधून चौकशी करावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.



