ठळक बातम्या

    सागरझेप संस्थे तर्फे डॉक्टर डे वृक्षारूपणाने साजरा ....

     एखाद्या व्यक्तीला कुठला आजार किंवा शरीरात दुखणे होते तेव्हा तो डॉक्टर कडे जाऊन औषधोपचार करतो. अपघातात किंवा गंभीर स्वरूपात रुग्णाची अवस्था असते. त्यावेळी डॉक्टर सर्व अनुभव वापरून शर्थीचे प्रयत्न करून रुग्णाचे प्राणवाचवण्याचे कार्य करतो. अशा सर्व डॉक्टरांना प्रणाम. 

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: सागरझेप बहुद्देशीय संस्था वणी जिल्हा यवतमाळ तर्फे डॉक्टर डे निमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन वणी चे अध्यक्ष डॉ. संकेत अलोणे, नेत्रतज्ञ डॉ. अनिकेत अलोणे यांचे हस्ते वृक्षारोपण करून डॉक्टर डे साजरा करण्यात आला.  पर्यावरणाचे संरक्षण करणे ही सर्व नागरिकांची, येणाऱ्या पिढींची आहे. आपल्या वणी परिसरात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांची कत्तल होत आहे. तसेच कोळसा खाणी असल्याने तापमान वाढत आहे. जमिनीत पाण्याची पातळी खाली जात आहे. त्यामुळे सर्व जनतेने पुढील भविष्याचा विचार करून जास्तीत जास्त झाडे लावून जगवली पाहिजे आणि आम्ही डॉक्टर सुद्धा वणी परिसर हिरवा गार करण्याचा प्रयत्न करू असे वृक्षारोपण करताना म्हणाले.

    यावेळी संस्था अध्यक्ष सागर मुने, दिनेश अँड्रसकर, परम अँड्रसकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

    Photo