विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सौजन्याने महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सचिव मा. संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली वणी शहरातील गरजू फळ व भाजी विक्रेत्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
समाजातील कष्टकरी व लघु व्यावसायिकांना पावसाळ्यात दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या जनसेवेच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. पावसाळ्यात रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या फळ व भाजी विक्रेत्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याने लाभार्थ्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाला तेजराज बोडे, राजूभाऊ अंकितवार, अशोक चिकटे, उत्तमजी गेडाम, प्रमोद लोणारे, प्रेमनाथ मंगाम, वंदना आवारी, करुणा कांबळे, शामा तोटावर, पलास बोडे, रोहित मालेकर, अलका मोहाळे, अनंता डुभारे, सविता गंजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.



