विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात ११ जुलै रोजी 'जागतिक लोकसंख्या दिन' विविध जनजागृतीपर उपक्रमांसह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अनिता टोंगे उपस्थित होत्या. यावेळी वाढती लोकसंख्या, कुटुंब नियोजन, आरोग्य, शिक्षण आणि शाश्वत विकास याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती करणे आणि समाजामध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन श्री. प्रतिश लखमापुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. प्रभुदास नगराळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

