विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : माहिती अधिकार कायदा २००५ च्या जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लहानू निलकंठ सालूरकर यांची वणी तालुका संघटक म्हणून नियुक्ती केली आहे.
महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. या पदाच्या माध्यमातून सालूरकर हे माहिती अधिकार कायद्याचा प्रचार-प्रसार, नागरिकांना मार्गदर्शन आणि जनजागृतीचे कार्य करणार आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांसह विविध स्तरावरून अभिनंदन होत असून, वणी तालुक्यात माहिती अधिकार चळवळीला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*"ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपविली, त्याला मी तळा जाऊ देणार नाही."*
*-लहानू सालूरकर*
आरटीआय कार्यकर्ता, वणी


