विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बळ देण्यासाठी तसेच ओबीसी (VJ, NT, SBC) जातीनिहाय जनगणनेच्या विषयावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने विदर्भ राज्य आंदोलन समिती, वणी आणि OBC (VJ, NT, SBC) जातीनिहाय जनगणना समिती, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सभा शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री खंडोबा-वाघोबा देवस्थान, पोलीस स्टेशनच्या मागे, वणी येथे होणार आहे.
या सभेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख तथा मार्गदर्शक मा. ॲड. वामनराव चटप हे प्रमुख मार्गदर्शन करणार असून, "स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे?" तसेच "OBC (VJ, NT, SBC) ची जातीनिहाय जनगणना का व्हावी?" या महत्त्वाच्या विषयांवर ते आपले विचार मांडणार आहेत.
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आणि ओबीसी समाजाच्या जातीनिहाय जनगणनेबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या महाविचार सभेला नागरिक, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

