ठळक बातम्या

    वणी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक उत्साहात; लोकशाही मूल्यांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : दि. १४ जुलै येथील वणी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक मोठ्या उत्साहात आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

    निवडणुकीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराद्वारे विद्यार्थ्यांसमोर आपले विचार आणि उद्दिष्टे मांडली. त्यानंतर गुप्त मतदान पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करून लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व अनुभवले.

    मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक तसेच शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्यांचे अभिनंदन केले. शाळेतील शिक्षक वंदना बाविस्कर यांच्या हस्ते नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करण्याची शपथ घेतली.

    या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित होण्यास मोठी मदत झाली. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालक व शिक्षकांनीही कौतुक केले.

    Photo