विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजाप्रती आपली बांधिलकी जपत रक्तदानासारख्या महान सामाजिक उपक्रमाद्वारे गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात यावर्षी वणी शहर मंडळाने २०० रक्तपिशव्यांचे (बॉटल्सचे) उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
या शिबिरात भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याने आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक, इच्छुक कार्यकर्ते व नागरिकांनाही रक्तदानासाठी सोबत आणावे, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
शिबिराचे ठिकाण : बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी
वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ३.००
आयोजक : भारतीय जनता पार्टी, वणी शहर
संपर्क :
* संयोजक : श्री. बालाजी भेदोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष – ९७३८३४१६१६
* सहसंयोजक : श्री. विलास डवरे, शहर उपाध्यक्ष – ९४०४५२६७६९
* सहसंयोजक : श्रीमती वैशाली वातिले, नगरसेवक – ९४२१८५१७२५
* सहसंयोजक : सौ. भारती बदखल, शहर उपाध्यक्ष – ८३२९११६७०५
आपला विनीत,
ॲड. निलेश माया महादेव चौधरी
शहर अध्यक्ष, वणी शहर
भारतीय जनता पार्टी

