विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
आर्णी/कोपरा : आज दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तथा उडान फाउंडेशन, आर्णी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा, कोपरा, ता. आर्णी, जि. यवतमाळ येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला*.
कार्यक्रमाची सुरुवात शब्दसुमनाने व भारतीय संविधानाच्या सामूहिक वाचनाने करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आली.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहयोग बँकेचे जिल्हा प्रमुख मा. गौरव वाकोडीकर सर
उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी, हरिभक्त परायण ग्रामगीताचार्य मा. श्री. दत्ताभाऊ मार्कंड, यवतमाळ जिल्हा भजन प्रमुख मा. श्री. यादवराव पिंगळे पाटील, आर्णी तालुका सेवाधिकारी मा. श्री. मारुती पिलावन पाटील, मा. श्री. बाबूलाल भाऊ राठोड व मा. श्री. तुळशीरामजी भायमारे आर्णी सहयोग शाखेचे मॅनेजर जयदीप राठोड सर व कर्मचारी युवराज सरोदे योगेश राठोड अनुप राजूरकर पूजा मॅडम आरती मॅडम कीर्ती मॅडम अलका मॅडम दुर्गेश सर सचिन सर विके सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी सहयोग बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. जयदीप राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, "शिक्षण हीच खरी संपत्ती असून शिक्षणाच्या बळावरच जीवनात मोठे यश आणि उच्च पद प्राप्त करता येते," असा प्रेरणादायी संदेश दिला.
मा. श्री. दत्ताभाऊ मार्कंड यांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि नियमित शिक्षण यांचे महत्त्व सांगत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.
मा. गौरव वाकोडीकर सर यांनी सहयोग बँकेच्या विविध बचत योजना, ठेवी, कर्ज सुविधा आणि समाजाभिमुख उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच शिक्षण, बचत आणि सामाजिक बांधिलकी यांचा परस्पर संबंध स्पष्ट करून विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित केले.या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. निलेश बनसोडे सर, सौ. रोशनी बनसोडे मॅडम, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकारी पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवृंद, पालक, सहयोग बँकेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा या उपक्रमाचे खरे यश ठरले.
"शिक्षण घेऊन केली दिवाळी, अज्ञानाची नाहीना होळी!"
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, सामाजिक उत्तरदायित्व जपणे आणि उज्ज्वल भविष्य घडविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.


