ठळक बातम्या

    जगन्नाथ बाबा मठ ते प्रगतीनगर परिसरातील नालीची दुरुस्ती करून पाणी साचण्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: वणी शहरातील जगन्नाथ बाबा मठ (महाविद्यालयासमोर) ते प्रगतीनगर, प्रभाग क्र. २ या परिसरातील नालीची लेव्हल खालावल्यामुळे पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परिणामी हे पाणी परिसरातील रस्ते व नागरिकांच्या घरांच्या आजूबाजूला साचून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

    साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

    या गंभीर समस्येची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणाची तात्काळ पाहणी करावी. नालीची लेव्हल योग्य प्रकारे दुरुस्त करून पावसाचे व सांडपाण्याचा सुरळीत निचरा होईल, यासाठी आवश्यक ती कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.

    यावेळी नगरसेविका सौ रिताताई पहापळे, नगरसेवक श्री लक्षण उरकुडे, सरचिटणीस भाजपा वणी शहर आशिष डंभारे, गणेश आसुटकर, महेश पहापळे व नागरिक उपस्थित होते.

    Photo