ठळक बातम्या

    पत्रकारांच्या हक्कासाठी झटणारे नेतृत्व! न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपकभाऊ छाजेड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. दीपक भाऊ छाजेड यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा होत आहे. या निमित्ताने वणीसह जिल्हाभरातील पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

    पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, संघटनात्मक बळकटीसाठी अहोरात्र कार्य करणारे आणि पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून दीपक भाऊ छाजेड यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशनने पत्रकारांच्या कल्याणासाठी, संघटनात्मक एकजुटीसाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत अनेक विधायक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

    पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम व्हावा, पत्रकारांना सन्मान, सुरक्षा आणि न्याय मिळावा, यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक पत्रकारांना नवे व्यासपीठ आणि संघटनात्मक बळ मिळाले आहे.

    त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी जीवन लाभो तसेच सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांची वाटचाल अधिक उज्ज्वल होवो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन, वणी यांच्या वतीने देण्यात आल्या.

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

                   शुभेच्छुक :

        न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन, वणी

    Photo