विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
घुग्गुस : घुग्गुस येथील ज्येष्ठ नागरिक व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व जनार्दन नागोबा चतुरकर यांचे रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचे पार्थिव दर्शन घुग्गुस येथील आमराई रोड येथील राहत्या घरी ठेवण्यात आले असून, सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता घुग्गुस येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्व. जनार्दन नागोबा चतुरकर यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, धार्मिक व नागरिक संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
धोबी परिट जनकल्याण संस्था, घुग्गुस तसेच महाराष्ट्र राज्य धोबी परिट महासंघ, चंद्रपूर जिल्हा यांनीही स्व. चतुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.
विदर्भ वार्ता /पत्र पोर्टल न्यूज वणी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

