वणी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ जुलै २०२६ रोजी वणी येथे भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मा. हंसराज अहीर (माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा माजी अध्यक्ष, ओबीसी आयोग, भारत सरकार), मा. संजीवरेड्डी बोदखुलवार (माजी आमदार), मा. तारेंद्र बोर्डे (माजी जिल्हाध्यक्ष, भाजप) तसेच मा. दिनकरराव पावडे (सदस्य, राज्य परिषद, भाजप) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. पवन एकरे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, यवतमाळ जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
कार्यक्रमांतर्गत सकाळी १२ वाजता ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता अनाथ मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वितरण करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आयोजित या सामाजिक उपक्रमाचे वणी परिसरात स्वागत होत असून, भाजप ओबीसी आघाडीच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
