विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: कायर येथील जि. प. शाळेतून ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत एकूण १० विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पास झाले होते. या पैकी ७ विद्यार्थ्यांची वणी तालुका शिष्यवृत्ती पात्र यादीत निवड झाली...
यश चंद्रभान मामीडवार
अमृता सतिश कोटरंगे
संस्कृती कवडू ढेंगळे
नव्या पंडित बांदुरकर
यश पुरुषोत्तम पिदुरकर
साक्षी जीवन गुरनुले
व पल्लवी अनिल येल्लावार.
याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. स्नेहदीप काटकर पं. स. वणी, श्री. गणेश भोयर शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. निलेश हेडाऊ शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख श्री. गजानन भगत यांचे कडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
आज जि. प. शाळा कायर येथे संपन्न झालेल्या अभिनंदन व कौतुक सोहळ्यात
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन, कौतुक करण्यात आले व केंद्रप्रमुख श्री गजानन भगत यांचेकडून व कायर शाळेकडून पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बक्षीस वितरक म्हणून श्री. नागेश धनकसार- सरपंच कायर, अध्यक्षस्थानी श्री. राजेश खुसपूरे- मुख्याध्यापक कायर, अतिथी म्हणून श्री. गजानन भगत- केंद्रप्रमुख कायर, श्री. नंदकिशोर अंबोरे- ग्रा.पं. सदस्य, श्री. किशोर कोट्टी सर, श्री. जनार्धन हालगरे सर, श्री. अमर मडावी
सर, कु. सोनाली टोंगे मॅडम, कु. श्रृतिका फटाले मॅडम, श्री. षण्मुख सिडाम सर, श्री. युवराज बेंदवार सर, अंशकालिन निदेशक श्री. राहुल विरुळकर सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्री. अमर मडावी सर यांनी केले.
प्रास्ताविक श्री. गजानन भगत सर यांनी.
यावेळी श्री. नागेशजी धनकसार, श्री. नंदकिशोर अंबोरे यांनी शुभेच्छापर मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतूक केले व सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवशी केक दिला जाईल असे जाहिर केले. अध्यक्षीय मनोगतातून श्री राजेश खुसपुरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळा व्यवस्थापन समिती कायर, ग्रामपंचायत कायर, श्री . गजानन आसुटकर, श्री. विलास ढेंगळे सर, पालकवृंद कायर,पालकवृंद बाबापूर, नवरगांव, महाकालपूर, पिंपरी, सैदाबाद, चेंडकापूर आदि पालकांकडून विधार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.



