ठळक बातम्या

    वणी येथे युवा साहिती कार्यक्रमाचे आयोजन


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : साहित्य अकादमी, नवी दिल्ली, शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा साहिती’  या  मराठी कविता-वाचनच्या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, वणीचे अध्यक्ष श्री. विजय मुकेवार राहणार असून, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा विदर्भ साहित्य संघ,शाखा-वणीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.     

            साहित्य अकादमी, नवी दिल्लीच्या सामान्य परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे स्वागतपर मनोगत व्यक्त करतील.

     कार्यक्रमात पुनीत मातकर (यवतमाळ), मीनाक्षी गोरंटीवार (वणी), अविनाश पोइनकर (चंद्रपूर), गीता रायपुरे (चंद्रपूर) आणि दिलीप अलोणे (वणी) हे कवी आपल्या कवितांचे वाचन करणार आहेत. मराठी कवितेतील नव्या संवेदना, समकालीन आशय आणि युवा कवींच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक आणि रसिकांनी या कविता-वाचन कार्यक्रमाचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

    Photo