विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
नागपूर : ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी ते संविधान चौक असा लाँगमार्च काढण्यात आला. या मोर्चात विदर्भातील विविध भागांतून आलेले कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
‘विदर्भ वेगळा झालाच पाहिजे’ या प्रमुख मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विदर्भातील सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधांचा अनुशेष दूर करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हाच पर्याय असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी दीक्षाभूमी ते संविधान चौक लाँगमार्च आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आज हा मोर्चा काढण्यात आला.मोर्चाच्या माध्यमातून ‘विदर्भ वेगळा झालाच पाहिजे’ असा बुलंद नारा देत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनआंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, जय विजय पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार, महिला आघाडी विदर्भ अध्यक्षा प्रा. मंजुषाताई तिरपुडे, पश्चिम विदर्भ प्रमुख प्राचार्य डॉ. पृथ्वीराज राजपूत, ॲड. नीरज खांदेवाले यांनी मार्गदर्शन केले.
मोर्चात यवतमाळ जिल्हा समन्वयक राजेंद्र झोटींग, विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, राजाभाऊ पुसदेकर, मधुसूदन हरणे, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, अक्षय महाजन, गिरीश तुरके, गोपाल भोयर, माणिकराव काटकर, अरविंद तायडे,बंडूजी शिवणकर, गजानन ठाकरे, गणेश मुटे, अरविंद राऊत, ॲड. अजय चमेडिया, चंद्रशेखर देशमुख, बबनराव ठाकरे, सुमित गमे, मधुसूदन कोवे यांच्यासह हजारो विदर्भवादी सहभागी झाले होते.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आगामी काळात आंदोलन अधिक व्यापक करून जनमत तयार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.



