ठळक बातम्या

    *श्री अंबिका फॅन्सीमध्ये राखी उत्सवाची खास तयारी; आकर्षक राख्यांचा मनमोहक संग्रह उपलब्ध*

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी अनुप राजे राजुरकर 

    आर्णी: रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आर्णी शहरातील श्री अंबिका फॅन्सी येथे आकर्षक व सुंदर राख्यांचा विशेष संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. विविध रंग, डिझाईन आणि आकर्षक स्वरूपातील राख्यांमुळे बहिणींसाठी भावाला प्रेमाची सुंदर भेट देण्यासाठी येथे उत्तम पर्याय उपलब्ध झाले आहेत.

    यंदाच्या रक्षाबंधनासाठी पारंपरिक राख्यांसोबतच आकर्षक डिझाईनच्या, स्टायलिश तसेच लहान मुलांना आवडतील अशा विविध प्रकारच्या राख्या श्री अंबिका फॅन्सीमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार विविध किमतींच्या राख्या येथे मिळत असून, एकाच ठिकाणी विविध प्रकारांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण असल्याने या सणाचा आनंद अधिक खास करण्यासाठी श्री अंबिका फॅन्सी येथे खास तयारी करण्यात आली आहे. आर्णी व परिसरातील नागरिकांनी या आकर्षक राखी संग्रहाला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रोप्रायटर सुनील भाऊ अल्लाडवार यांनी केले आहे.

    पत्ता : शिवनेरी चौक, आर्णी

    श्री अंबिका फॅन्सी – आपल्या लाडक्या भावासाठी सुंदर राखी, आपल्या प्रेमाची खास निशाणी!



    Photo