ठळक बातम्या

    व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेसाठी सिद्ध व्हा. डॉक्टर दिलीप अलोने

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    पाटण : शिक्षणाची कास धरत असतानाच स्वतःमधील सुप्त गुणांना अधिक चालना देऊन अंगभूत कौशल्य विकसित करा आणि निरोगी राहण्यासाठी व्यसनाच्या आधी न होता व्यसनमुक्त भारताच्या संकल्पनेसाठी सिद्ध व्हा असे आवाहन सुप्रसिद्ध लोककलावंत डॉक्टर दिलीप अलोने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले 

    पाटण येथील राजीव विद्यालय तथा राजीव प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे आयोजित व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमात डॉक्टर अलोने विद्यार्थ्यांची संवाद साधत होते 

    मुख्याध्यापक विजय मेंगनवार अध्यक्षस्थानी होते तर मुख्याध्यापक सतीश दासपतवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रमेश पडलवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला स्वप्निल पैलवान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले 

    डॉक्टर दिलीप अलोने यांनी विद्यार्थ्यांना हसवत खेळवत अनेक गमतीजमती सांगून प्रभावित केले व यशस्वी माणूस बनण्यासाठी तत्परता तपश्चर्या आणि तपस्वीता याचे आयुष्यातील मोल अधोरेखित केले 

    विठ्ठल मुनगेलवार किशोर द्या वरती वार व शिक्षक कर्मचारी वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

    Photo