विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील राशन कार्डधारकांनी राशन कार्डच्या KYC प्रक्रियेसाठी कोणालाही ₹20 किंवा कोणतीही रक्कम देऊ नये. याबाबत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता, KYC प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तरीसुद्धा काही ठिकाणी KYCच्या नावाखाली सर्वसामान्य व गरीब नागरिकांकडून पैसे मागितले जात असल्यास, नागरिकांनी कोणतेही पैसे देऊ नयेत. तसेच कोणत्याही राशन धान्य दुकानदाराने KYCच्या नावाखाली नागरिकांवर जबरदस्ती करू नये.
वणी विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही राशन धान्य दुकानात KYCच्या नावाखाली पैसे मागितले जात असल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी संबंधित राशन दुकानदाराचे नाव, दुकानाची माहिती व शक्य असल्यास पुरावे घेऊन युवा हुंकार संघटनेशी तात्काळ संपर्क साधावा.
जनतेच्या हक्काची लूट कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. गरीब व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी युवा हुंकार संघटना खंबीरपणे उभी आहे.
KYC मोफत आहे!
पैसे मागितले तर गाठ युवा हुंकार संघटनेशी आहे!
— युवा हुंकार संघटना
जनतेच्या हक्कासाठी सदैव संघर्षशील!
संस्थापक अध्यक्ष
अजिंक्य सु. शेंडे
युवा हुंकार संघटना, महाराष्ट्र राज्य

