विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरवासीयांसाठी एक महत्त्वाची आरोग्यविषयक बातमी समोर आली आहे. वणी शहरात प्रथमच सर्जिटेक हॉस्पीटल च्या वतीने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”“हे आरोग्य शिबिर 12 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, विविध आजारांबाबत तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”“या शिबिरात स्त्री रोग, बाल रोग, हृदय रोग, अस्थी रोग, किडनी रोग, कर्क रोग, त्वचा रोग, मानसिक रोग, पोटाचे आजार तसेच फुफ्फुसांच्या आजारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.”विशेष म्हणजे, सुरू असलेल्या उपचारांबाबत समाधान मिळत नसलेल्या रुग्णांसाठी ‘Second Opinion’ निःशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
यासोबतच 24 तास आपत्कालीन सेवा, ICU आणि Critical Care, Ambulance, Pharmacy, Private Rooms, General Ward, ECG आणि 2D Echo अशा विविध सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.”अधिक माहितीसाठी 07239-299103 या क्रमांकावर संपर्क साधता येणार असून, वेळ आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत राहणार आहे.
पत्ता - काळे ले आउट ब्राम्हणी रोड विवेकानंद शाळे जवळ
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, या निःशुल्क आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


