ठळक बातम्या

    “अंतरगाव शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सांभाळली एक दिवस शिक्षकांची भूमिका”

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    राजुरा : दि. 5/9/2026 रोज शनिवारला जि. प. उच्च प्राथ. शाळा अंतरगाव (अन्नूर ) पं. स. राजुरा जि. चंद्रपूर येथे *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* यांचा जन्मदिन *शिक्षक दिन*म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त शाळेत *स्वयंशासनाचा* उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थांनी शिक्षकांना पुष्प देऊन शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकांची भूमिका अत्यंत उत्साहाने आणि जबाबदारीने पार पाडली. विद्यार्थ्यांनी वर्गात अध्यापन केले तसेच शाळेतील विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेतला.

    या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव, शिस्त आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत झाली. शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आणि जबाबदारीची आहे, याचीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.

    शिक्षक दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा स्वयंशासनाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला. 

    यनिमित्य कार्यक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून शालेय परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण केलंत.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे *अध्यक्ष मा. विठोबाजी लोणारे* सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,प्रमुख अतिथी *राजकुमार चिंचोलकर सर* व *बाळकृष्ण मसराम सर* उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून आनंद साजरा करून केला व शालेय मुख्यमंत्री व शाळेचे छात्रमुख्याध्यापक *सोहम धर्मपाल रासपल्ले* यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

    Photo