ठळक बातम्या

    वणी पब्लिक स्कूल मध्ये हिंदी भाषा दिन उत्साहात साजरा हिंदीच्या गोडव्याने आणि विविध उपक्रमांनी शाळेचा परिसर झाला हिंदीमय

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी :वणी पब्लिक स्कूल येथे हिंदी भाषा दिन मोठ्या उत्साहात व विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचे महत्व,तिची समृद्ध साहित्यिक परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली . यावेळी हुमेझा शेख,श्रद्धा ढवस यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारी भाषण केले. त्याचप्रमाणे आरोही चिंचोलकर हिने सुंदर कविता सादर केली . निशांत मडावी याने हिंदी भाषेवरील मुहावरे विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे हिंदी भाषेवर सुविचार,घोषवाक्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.हिंदी भाषेच्या विकासात साहित्यिकांचे योगदान  याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली . यावेळी शाळेचे मुख्याध्यापकश्री. सतीश बविस्कर यांनी विद्यार्थ्यांना हिंदी ही केवळ एक भाषा नसून देशाच्या विविध भागांना जोडणारी संवादाची सशक्त कडी आहे असा संदेश दिला.तर

    शाळेच्या उपमुख्याध्यापक  आश्लेषा जेणेकर यांनी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा नियमित वापर करण्याचा तसेच तिच्या समृद्ध परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाला हिंदी भाषा ही भारतातील विविध प्रांत,संस्कृती आणि लोकांना जोडणारी महत्त्वपूर्ण भाषा असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका संतोषी ताजने व मानसिक कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी च्या विद्यार्थिनी शरण्या खाडे आणि  मंतशा खान यांनी केले. तर आभारप्रदर्शन इयत्ता पाचवी चीविद्यार्थिनी माही तुरानकर हिने केले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हिंदी भाषा दिनाचा कार्यक्रम अत्यंत मनोवेधक ,ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरला.

    Photo