ठळक बातम्या

    संघर्षाची शिलेदारी, निष्ठेची ताकद अन् कार्यकर्त्यांचा विश्वास; ......शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...

     वणी-मारेगाव-झरी तालुक्यातील शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग; सर्वपक्षीय नेत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : सत्ता असो वा संघर्षाचा काळ, पक्षसंघटनेशी आणि कार्यकर्त्यांशी असलेली नाळ कायम जपणारे नेतृत्वच जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करते. शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे यांचा आजवरचा राजकीय प्रवास संघर्ष, संघटन आणि समाजकारणाच्या त्रिसूत्रीवर उभा राहिला आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास, सर्वसामान्यांची साथ आणि संघर्षातून मिळालेला अनुभव हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद मानली जाते.

    याच नेतृत्वाचा आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आशिष खुलसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आला. वणी- तालुकाध्यक्ष प्रसाद ठाकरे, मारेगाव तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर झरी तालुकाध्यक्ष बाळू चेडे  यांच्या वतीने वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तिन्ही तालुक्यांतील शिवसैनिक, युवा शिवसैनिक, महिला शिवसैनिक तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जल्लोषात वाढदिवस साजरा करत आशिष खुलसंगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

    शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने शक्तिप्रदर्शन

    वणी, मारेगाव आणि जरी तालुक्यातील शिवसैनिकांची मोठी उपस्थिती ही या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. युवा कार्यकर्त्यांपासून महिला शिवसैनिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ‘नेता आणि कार्यकर्ता’ यांच्यातील घट्ट नाते किती मजबूत आहे, याचे दर्शन या कार्यक्रमातून घडले, अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

    आशिष खुलसंगे यांनी सरपंचपदापासून सुरू केलेल्या राजकीय प्रवासात जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत मजल मारत आज शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली आहे. ग्रामीण भागाशी असलेली घट्ट नाळ, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीची धडपड आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी यामुळे त्यांचे नेतृत्व अधिकाधिक बळकट होत असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

    पक्षभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांच्या शुभेच्छा

    आशिष खुलसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. देविदास काळे तसेच मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे कार्यक्रमाला सर्वपक्षीय स्वरूप प्राप्त झाले.

    यावेळी उपस्थित मान्यवरांनी आशिष खुलसंगे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात अनेकांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रकाश टाकला.

    ‘पदापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा’ हीच ओळख

    राजकारणात गर्दी जमवणारे अनेक असतात; मात्र संकटाच्या काळात कार्यकर्त्यांना सोबत ठेवणारे नेतृत्वच खरे नेतृत्व ठरते. आशिष खुलसंगे यांच्या राजकीय वाटचालीत हीच बाब प्रकर्षाने जाणवते. सत्ता असो वा संघर्ष, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ कायम जपण्याची त्यांची भूमिका त्यांच्या नेतृत्वाची मोठी जमेची बाजू ठरली आहे.

    संघर्षाची शिदोरी, निष्ठेची ताकद, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि सर्वसामान्यांची साथ या बळावर आशिष खुलसंगे यांचा राजकीय प्रवास अधिक भक्कम होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वणी-मारेगाव-झरी तालुक्यातील शिवसैनिकांनी दाखवलेला उत्साह आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छा यामुळे त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

    कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि शुभेच्छांनी भारावलेल्या या वाढदिवस सोहळ्यात आशिष खुलसंगे यांच्यावर दिवसभर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला.

    Photo