ठळक बातम्या

    श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या पालखी शोभायात्रेत हंसराज अहीर सहभागी; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त वणी येथील पुरातन श्री रंगनाथ स्वामी मंदिरातून भव्य पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहीर सहभागी झाले.

    यावेळी हंसराज अहीर यांनी भगवान श्री रंगनाथ स्वामींची आरती करून दर्शन घेतले. तसेच राज्य, राष्ट्र आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तिमय वातावरणात निघालेल्या पालखी शोभायात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    या प्रसंगी वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचीही उपस्थिती होती. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

    भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे धार्मिक उत्सव समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. पालखी शोभायात्रेमुळे वणी शहरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.



    Photo