ठळक बातम्या

    विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या पावन 'जटा' आज भाविकांच्या दर्शनासाठी खुल्या. (आमदार संजय देरकर यांचे भाविकांना दर्शनाचे जाहीर आवाहन)

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज यांच्या पावन भार (जटा) आज, बुधवार, ०२ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व भाविक भक्तांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. आमदार श्री. संजयभाऊ देरकर यांच्या वणी येथील निवासस्थानी हे दुर्मिळ व अलौकिक दर्शन आयोजित करण्यात आले असून, परिसरातील भाविकांनी या पावन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देरकर यांनी केले आहे.

    सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या या पवित्र जटा सन १९९१ पासून स्व.रुद्राजी पाटील देरकर यांच्या निवासस्थानी अत्यंत भक्तीभावाने संग्रहित व जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराजांच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा लाभ सर्वसामान्य भाविकांनाही घेता यावा, या हेतूने आज सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या मर्यादित वेळेत हे पावन भार भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले आहेत.

    वणी शहर तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक, ग्रामस्थ आणि गुरुकृपेची ओढ असणाऱ्या भक्तांनी वेळेत उपस्थित राहून या दुर्मिळ दर्शनाचा लाभ घ्यावा व आपले जीवन कृतार्थ करावे, असे  आवाहन आमदार  संजय देरकर आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

    Photo