विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : भालर आणि उकणी परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बहुप्रतीक्षित बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे या परिसरातील प्रवाशांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होऊन विद्यार्थी, कर्मचारी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वणी–भालर–उकणी मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी काँग्रेस नेते संजय भाऊ खाडे यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या बससेवेमुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच दैनंदिन कामानिमित्त वणी शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना आणि कामगारांना नियमित प्रवासासाठी मोठा फायदा होणार आहे.
जनतेच्या दैनंदिन सुविधांचा विचार करून बससेवा सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संजय खाडे यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

