ठळक बातम्या

    युवा सेना चंद्रपूर जिल्हा लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शिवसेनेच्या युवा सेना चंद्रपूर जिल्हा लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे विक्रांत चचडा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    युवा पिढीशी सातत्याने संवाद साधत संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेले विक्रांत चचडा हे सक्रिय आणि उत्साही युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत. सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेत युवकांना संघटित करून समाजहिताच्या उपक्रमांना चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

    संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणे, ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यांच्या नेतृत्वातून युवा वर्गाला सकारात्मक दिशा मिळावी आणि आगामी काळात त्यांच्या हातून अधिकाधिक समाजोपयोगी कार्य घडावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    वाढदिवसानिमित्त विक्रांत चचडा यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

    शुभेच्छूक :

    विदर्भ वार्ता पोर्टल न्यूज, वणी

    Photo