ठळक बातम्या

    नागपुरात धोबी (परीट) समाजाचा एल्गार; २७ ऑक्टोबरपासून आमरण आणि साखळी उपोषणाला सुरुवात

     आरक्षणाच्या मागणीसाठी धोबी समाज आक्रमक; नागपूरच्या संविधान चौकात बेमुदत उपोषण

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    नागपूर : महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आज दि. २७ ऑक्टोबर २०२६ पासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत आमरण आणि साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस आहे.

    या उपोषणाला समाज बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत असून, आज समिती प्रमुख आशिष कदम, अध्यक्ष डी.डी.सोनटक्के, कार्याध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार, जेष्ठ मार्गदर्शक सुधीर खैरनार, युवा अध्यक्ष राहुल वराणकर,रेखाताई कदम ,मुरलीधर शिंदे,दिलीप शिंदे,सुनिल शिंदे मुख्य महासचिव संतोष सवतिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  उपोषणाला प्रारंभ झाला.

    आमरण उपोषणाला बसलेले कार्यकर्ते :

    श्नी,बळवंतराव साळुंखे, ज्योतिबा दादासाहेब  नन्नावरे, मनोहर चिंचोलकर, शंकर  परदेशी, संतोष  औढेंकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत.

    साखळी उपोषणाला,पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील हजारो समाज बांधव व लक्षणीय महिला भगिनींनी बसलेले आहे.

    मुख्य मागणी काय आहे?

    राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. दशरथ भांडे समितीच्या तिसऱ्या शिफारशीनुसार SC प्रवर्गाच्या तत्सम सवलती तात्काळ लागू कराव्यात. महाराष्ट्र राज्यातील धोबी, परीट, वरठी, रजक, वनी, मडवळ, मंडलेवार यांचा अनुसूचित जातीत समावेश होत नाही तोपर्यंत अनुसूचित जातीला मिळणाऱ्या सर्व आरक्षणाच्या सोयी-सवलती खास बाब म्हणून राज्य शासनाने त्वरीत द्याव्यात, ही प्रमुख मागणी आहे.

    यावेळी आंदोलकांनी "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा", "एक धोबी ४० लाख धोबी" आणि "तो पर्यंत माघार नाही" अशा जोरदार घोषणा दिल्या.

    स्व. रमाकांतशेठ कदम संस्थापक आरक्षण समिती यांच्या विचाराने प्रेरित होऊन हा लढा सुरू असून समाज एकजुटीने आपला हक्क मिळवूनच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






    Photo