ठळक बातम्या

    कायर येथील विवेकानंद विद्यालयातील एस एच व्ही आर चे मूल्यांकन विस्ताराधिकारी गणेश भोयर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : तालुक्यातील कायर येथील विवेकानंद विद्यालयाला आज दिनांक 29ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता पंचायत समिती वणी शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी गणेश भोयर साहेब व कायर केंद्राचे केंद्रप्रमुख गजानन भगत साहेब यांनी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेल्या एस एच व्ही आर ( Swach Evam Harit Vidyalaya Rating ) या उपक्रमाचे मूल्यांकन करण्यासाठी शाळेला आकस्मित भेट दिली.

    यावेळी विद्यालयात प्रवेश करून त्यांनी मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांची भेट घेऊन एस एच व्ही आर या उपक्रमा संदर्भात माहिती विचारून शाळेत उपलब्ध असणाऱ्या सर्व बाबींची पाहणी करण्यात आली .त्यानंतर  वर्ग 9 व्या व वर्ग10 व्या वर्गातील मुलांशी संवाद साधून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.  तसेच शालेय दस्तऐवज शिक्षक हजेरीबुक, विद्यार्थी हजेरी, सखी सावित्री, विद्यार्थी सुरक्षा, तक्रारपेटी, वाचनालय, शिक्षक कक्ष , वर्ग खोल्या, मुलींचे व मुलांचे व कर्मचाऱ्यांचे शौचालय, पिण्याचे पाणी,हँडवाश स्टँड, शोष खड्डा,  प्रयोगशाळेची पाहणी केली, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती या सर्व बाबींची माहिती घेतली शाळा तपासणीत विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे वर्ग खोल्या लहान असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ग खोलीत बल्ब ची व्यवस्था करण्यात यावी .  

    असे मार्गदर्शन विस्ताराधिकारी गणेश भोयर व केंद्रप्रमुख गजानन भगत यांनी केले व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. या भेटीमुळे शालेय व्यवस्थापनात सकारात्मक सुधारणा व पुढील विकासासाठी मार्ग प्रशस्त झाला.यावेळी मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे तसेच  सहायक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली ठाकूर, कनिष्ठ लिपिक सचिन टोंगे, मधुकर कोडापे, आकाश बोरूले उपस्थित होते.



    Photo