ठळक बातम्या

    प्रशासनाच्या जैसे ते धोरणाला कंटाळून येत्या सात दिवसात निराकरण करा अन्यथा 13 नोव्हेंबरला चक्का जाम आंदोलन होणार

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: 1) दि. 07/08/2026 रोजी मा. उपविभागीय अधिकारी, वणी यांना दिलेले निवेदन.

    2) दि. 04/09/2016 रोजी मा. उपविभागीय अधिकारी यांनी घेतलेली कोल डेपो धारक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक.

    3) दि. 21/09/2026 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे झालेली बैठक.

    4) दि. 21/10/2026 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेले पत्र.

      सोमनाळा निंबाळा ते चिखलगाव चौफुली.. सोबतच राजूर रिंग लगत सुरु असलेले कोल डेपो व डोलोमाईट कंपनी व राजूर येथील रॅक पॉईंट मूळे प्रदूषण आरोग्य धोक्यात आलेलं आहेत व सतत च्या ओव्हरलोड वाहतूकमूळे राजूर रिंग रोड चीं चाळणी झाली आहेत  या बाबतीत येत्या सात (7) दिवसात  बैठक घेऊण  निराकरण करण्यात यावे अन्यथा येत्या 13 नोव्हेंबर ला खालील दिलेल्या मागण्या घेऊन राजूर रिंग रोड येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार. 

    महोदय,

    उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळविण्यात येते की, वणी तालुक्यातील सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, बोदाड पळसोनी, मेघदूत, कळमना (लालपुलीया) व चिखलगाव परिसरात अनधिकृत कोल डेपो व कोल वॉशरी यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे.

    *या ज्वलंत विषयाकडे उपरोक्त सर्व विभाग हेतूपुरस्सर दुर्लक्ष व टाळाटाळ करीत असून वेळकाढू धोरण अवलंबून अप्रत्यक्षरित्या येथील कोल डेपो धारक व व्यापारी वर्गास सहकार्य करीत आहेत.* 

    प्रवीण खानझोडे  

    लढा संघटना वणी विधानसभा 

    या विषयाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही खालील बाधित गावांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करणार आहोत.

    मागण्या:

    *1)* सोमनाळा/निंबाळा रोड ते चिखलगाव चौफुली पर्यंत मुख्य महामार्गालगत 500 मीटरच्या आत असलेले सर्व कोल डेपो तात्काळ बंद करण्यात यावेत.

    *2)* राजूर रिंग रोड (जिल्हा परिषद, यवतमाळ रोड) लगत असलेले सर्व कोल डेपो बंद करण्यात यावेत.

    *3)* रुख्माई कोल वॉशरी / विकास कोल / रॅक पॉईंट / डोलोमाईट यासाठी जिल्हा परिषद रोडवरून होणारी ओव्हरलोड वाहतूक तात्काळ थांबविण्यात यावी.

    *4)* कळमना ग्रामपंचायतीने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने ज्या पद्धतीने संबंधित कोल वॉशरी व कोल डेपो धारकांकडून रस्त्याचे बांधकाम करून घेण्यात आले, त्याच पद्धतीने राजूर रिंग रोडचे काम तात्काळ करून घेण्यात यावे.

    *5)* मागील 15 ते 20 वर्षांपासून सदर कोल वॉशरी / कोल डेपो / लाईमस्टोन / डोलोमाईट कंपनीकडून कोणतेही पर्यावरण / आरोग्य विषयक शिबीर घेण्यात आले नाही, त्याबाबत चौकशी करावी.

    यांच्यावर आपण काय कार्यवाही करणार याचे लेखी उत्तर देण्यात यावे.

    तरी आपणास विनंती की, वरील मागण्यांचा तात्काळ विचार करून न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल याची प्रशासनाने नोंद  घावी यावेळी 

    लढा संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे 

    ऍड रुपेश ठाकरे 

    राहुल क्षीरसागर 

    मंगेश येटे  पंकज मोरे राहुल कुत्तरमरे  मनोज ढेंगळे शिवाजी मोरे  ईमामुल हुसेन अतुल चांदेकर भगवान मोहिते धनंजय भोयर.. रोशन गारपेलीवर यांच्या उपस्थितीत निवेदन दिले..

    *आपले विश्वासू,*

    *समस्त बाधित नागरिक,*

    Photo