ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सुदर्शन राऊतची इंद्रधनुष्यासाठी निवड.

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी  : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालया  वाङ्मय स्नातक द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सुदर्शन राऊत याची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या चमूमध्ये निवड करण्यात आलेली आहे. 

            विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आयोजित विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यापीठात साजऱ्या होणाऱ्या युवा महोत्सवाच्या उपक्रमामध्ये सादर केलेल्या प्रस्तुती करण्याच्या आधारे ही निवड करण्यात येते. 

            नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परिक्षेत्रात दि. १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ या काळात आयोजित अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेमध्ये हा विद्यार्थी एकांकिका, स्किट, माईम, मिमिक्री यासाठी असणाऱ्या विद्यापीठाच्या चमूत त्याची निवड करण्यात आली आहे. 

             २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर अशा दोन चरणांमध्ये अमरावती विद्यापीठात या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण होणार आहे.

    सुदर्शन राऊत याने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे आणि मार्गदर्शक डॉ. अंजली आत्राम यांना दिले आहे. 

           लोकमान्य टिळक महाविद्यालय प्राचार्यकक्षात, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला.

             शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्यासह सर्व संचालक गण आणि प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या सह सर्व प्राध्यापक तथा  शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सुदर्शन राऊत यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपलब्धी बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

    Photo