विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: लोकदूत वृत्तपत्राचे प्रतिनिधी श्रीकांत किटकुले यांचे गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१५ ला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने वणीतील पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, विविध स्तरांतून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. आज दुपारी 3 वाजता राहते घर जटाशंकर चौक येथून अंत्ययात्रा निघणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, श्रीकांत किटकुले हे सकाळी वृत्तपत्र वाटप करण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या छातीत अचानक दु:खु लागले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
किटकुले यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या किटकुले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दैनिक लोकदूतचे ते वणी प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून, त्यांना विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
