ठळक बातम्या

    जैताई देवस्थानात धनत्रयोदशीला दिवाळी पहाट कीर्तनाचे आयोजन ह.भ.प. श्रीपाद उपाध्याय यांचे कीर्तन; शुक्रवारी सकाळी ६ वाजता कार्यक्रम

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून श्री जैताई देवस्थान समिती, वणीच्या वतीने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी पहाट कीर्तन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उमरखेड, जि. नागपूर येथील ह.भ.प. श्रीपाद उपाध्याय विनाद बुवा खांड यांचे कीर्तन होणार आहे.

         शुक्रवारी पहाटे ६ वाजता श्री जैताई देवस्थानाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होईल. दीपावलीच्या मंगलमय वातावरणात भक्तिरसाचा आनंद घेण्याची संधी वणीकर भाविकांना या निमित्ताने मिळणार आहे.

    श्री जैताई देवस्थान समितीच्या वतीने आयोजित या कीर्तन सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिरसाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




    Photo