ठळक बातम्या

    वणी नगर परिषदेत प्रजासत्ताक दिन साजरा

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी नगर परिषद कार्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष मा. सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

    या प्रसंगी नगर परिषदेचे उपाध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी तसेच नगर परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

    नगराध्यक्ष सौ. विद्या खेमराज आत्राम यांनी आपल्या मनोगतात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करून संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवून नागरिकांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

    कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




    Photo