विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार,शेतकरी व आमजनविरोधी आणी भांडवलदारधार्जिणे धोरणाविरोधात 12 फेब्रु.ला राष्ट्रिय कामगार,कर्मचारी संघटना कृती समीती व संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी संप पुकारला होता.या संपास पाठींबा म्हणुन वणी येथे काल भारतिय कम्युनिस्ट पक्ष,आयटक,शेतकरी संघटना,प्रहार जनशक्ती पक्ष व संभाजी ब्रिगेड यांचे संयुक्त विद्यमाने प्रचंड मोर्चा काढला.
भाकपचे अनिल हेपट,अनिल घाटे,शेतकरी संघटनेचे देवराव धांडे,दशरथ बोबडे,प्रहार जनशक्ती पक्षाचे सतिश देरकर,रघुविर कारेकर व आशा युनियन आयटकच्या अर्चनाताई कडु,सुचिता निवडींग,अनिता जाधव यांचे नेत्रुत्वात शिवाजी महाराज चौकातुन प्रचंड मोर्चा निघुन उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर धडकला व आपले विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.मोर्चामध्ये अथर्व निवडींग,वासुदेव गोहणे,प्रविण आडे,पांडुरग ठावरी,पंढरी मोहीतकर,भास्कर बलकी,दिनेश शिटलवार,पंढरी नांदेकर,दिनेश पारखी,नितीन तुराणकर यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.



