विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : तालुक्यातील राजूर कॉलरी व परसोडा येथे शोषण विरहित समाजवादी व्यवस्थेसाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या तरुण क्रांतिकारी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना २३ मार्च ला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने अभिवादन करण्यात आले.
"देशाला इंग्रजांच्या साम्राज्यवादी गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता देशात मोठ्याप्रमाणात क्रांतिकारी संघर्ष करीत असताना मात्र शहीद भगतसिंग यांनी फक्त इंग्रजांपासून स्वातंत्र्य नाही तर शोषणमुक्त, जातीविहीन समाजवादी समाजव्यवस्था आणण्यासाठी संघर्ष करीत होते. त्यांनी हा विचार रशिया मध्ये झालेल्या कामगारांच्या क्रांतीमधून प्रेरणा घेतली होती. त्यामुळे भगतसिंग व त्यांच्या संघटनेचा हा विचार आणि त्यांची कृती इंग्रजांच्या साम्राज्यवादी सत्तेला धोकादायक असल्याने इंग्रजांनी त्यांना वयाचा २३ व्या वर्षी फासावर लटकवले. देशाला आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष लोटून गेल्यानंतर फोडा आणि राज्य करा ही नीती देशातील भांडवलदार वर्गाचे प्रस्थापित पक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहीद भगतसिंगांचे विचार व त्यांची कृती आजचा ह्या काळात प्रासंगिक आहे", असे विचार राजूर कॉलरी व परसोडा येथे घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.
राजूर कॉलरी येथे माकपचे जिल्हा सचिव कॉ ॲड कुमार मोहरमपुरी, माजी पं स सदस्य अशोक वानखेडे, महेंद्र श्रीवास्तव, विजय तोताडे, राजेंद्र पुडके, अमृत फुलझेले, गणेश रामटेके यांनी तर परसोडा येथे माकपचे तालुका सचिव कॉ गजानन ताकसांडे व जि क सदस्य कॉ बादल कोडापे यांनी आपले विचार उपस्थितांसमोर व्यक्त केले.
राजूर कॉलरी व परसोडा येथील ह्या अभिवादन कार्यक्रमात प्रामुख्याने महेंद्र अंबागडे, शुभम अकोटकर, बंडू ठमके, जयंत कोयरे, साजिद खान, अमित करमरकर, सिनू कलवलवार, मनोज सोनेकर, खालिद हुसेन, विजय जंगीलवार, राकेश इग्रपवार, जाहिद हुसेन, अमर नगराळे, रिजवान खान, कुमार कोंकटवार, अजय भुसारी, विशाल पंधरे तर परसोडा येथे मंगेश सरोदे, वामन बोबडे, विनायक कोवे, दिनकर सरोदे, महादेव टेकाम, विठ्ठल आत्राम, बबन ताकसांडे, संजय कोडापे, अनुसया टेकाम, कुंताबाई चटप, शकुनाबाई आत्राम, रमेश ताकसांडे, बेबीबाई सरोदे, किशोर बडवाईक, मंथनाबाई उपरे, मंगेश बडवाईक आदी उपस्थित होते.


