विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : सुतार समाज महिला मंच, वणी यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता महादेव मंदिर, सुतारपुरा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुतार समाजातील सर्व महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीच्या महिला अध्यक्षा मा. सौ. वंदनाताई पुरुषोत्तम आवारी राहणार आहेत. प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. प्रियंका चौधरी (ए.पी.आय., पोलीस स्टेशन वणी) तसेच कु. मुस्कान ज. सैय्यद (मुख्य क्षेत्रीय अधिकारी, TDRF) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात वैद्य सुवर्णा चरपे (श्री विश्व योग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र, वणी) या “स्वयंप्रतिकारक रोगाशी लढताना” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान देणार आहेत.
यावेळी गट ग्रामपंचायत सदस्य माथोली व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कु. प्रतीक्षा अरुण देऊळकर, नगरपरिषद वणीच्या नगरसेविका सौ. आरतीताई गिरीश वांढरे आणि सौ. अर्चनाताई शंकरराव झिलपे व समाजातील होतकरू आणि कर्तबगार
महिला यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १ वाजता व्याख्यान व महिलांच्या सत्कार समारंभाने होईल. दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत “मम्मी स्पेशल” नृत्य व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज महिला मंच, वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सुतार समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

