विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी पंचायत समिती अंतर्गत मौजा मानकी येथे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सौ. बेबिताई मालेकर, सुनिता पत्रकार, प्रदीप मालेकर, गणेश वाढई, ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश सरवर तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी ज्योतिबा फुले यांच्या समाजप्रबोधन, शिक्षण आणि समतेच्या विचारांची आठवण करून देत त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करण्याचे आवाहन केले.

