ठळक बातम्या

    सिद्धार्थ वसतीगृहात प्रा. घनश्यामजी धाबर्डे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस संपन्न.


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

     वणी - सिद्धार्थ वसतीगृह वणीच्या वतीने संस्थेचे संचालक प्रा.घनश्यामजी धाबर्डे यांचा  अमृत महोत्सवी (७५ वर्ष पूर्ण) वाढदिवस अतिशय उत्साही वातावरणात संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. पुरुषोत्तमजी  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या आगळ्या-वेगळ्या समारंभाला प्रा. रंजन रासेकर आणि प्राः भिमराव तामगाडगे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रेरणांना मेनबत्ती अगरबत्ती प्रजलीत करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नवनाथ नगराळे, बाळासाहेब राजूरकर ,जगदीश भगत व अँड दौततराव वानखेडे उपस्थित होते. उपस्थित सर्व पाहुण्यांनी प्रा. घनश्याम धाबर्डे यांच्या व्यक्तीमहत्त्वाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्न केला.

    प्रा. घनश्याम धाबर्डे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगीतले की मी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत राहीलो परंतु माझ्या महाविद्यालयीन कार्यात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचे व्यकीमहत्व घडविण्याचे काम मी माझ्या परीने केले.


    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. पुरुषोत्तम पाटील म्हणाले की, प्रा. धाबर्डे नियत वयोमानानुसार महाविद्यालयीन सेवेतून निवृत्त झाले. परंतु सामाजिक  धार्मीक कार्यात धडाडीने कार्य करीत राहिले. वणी शहरामध्ये वास्तव्यात असतांना समाजाला योग्य दीशा देण्याचे काम करीत राहीले. नागपूरला स्थलांतरीत झाल्यानंतर नव्या शहरात निवृत्त मानूस शांत बसेल असे वाटले, परंतु तेथे ही त्यांनी विविध उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला. नागपूर येथे त्यांच्या अमृत  महोत्सवी वाढदिवसा नित्रित उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्याकडे पाहील्या नंतर त्यानी विविध कार्यक्रमाच्या निमित्याने जोडलेला जनसमुदाय पाहायला मिळाला.

    त्यांच्या सहचारिणीचे निधन दोन वर्षापूर्वी झाले ते दुःख कुरवाढीत न बसता त्यांनी आपल्या कार्याचा पसारा आनखी वाढविला. धम्मसंगोष्टी, बुद्धविहार समन्वय समिती, मृत्यूनंतर अवयवदान चळवळ, संविधान प्रसार प्रचार चळवळ, पारन भाषेचा प्रचार व प्रसार इत्यादी कार्यात सक्रीय सहभागी राहीले असे प्रा पुरुषोत्तम पाटील यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुन बोलतांना सांगीतले.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नवनाथ नगराळे यांनी केले तर संचलन व आभार अधिक्षक मंगल तेलंग यांनी केले. कार्यक्रमाल वसतीगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

    स्नेहभोजनांनी कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक कैलाश वडस्कर क गुलाब भोयर,  सौ. निलीमा भोयर यांचे विशेष सहकार्य लाभले.





    Photo