ठळक बातम्या

    पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करणारे संपादक विनोद घुईखेडकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव..!


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     यवतमाळ: नमो महाराष्ट्र तसेच यवतमाळ मार्मिक या वृत्तपत्रांचे संपादक, निर्भीड व अभ्यासू पत्रकार म्हणून ओळख असलेले मा. श्री. विनोद घुईखेडकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी, कामगार, युवक तसेच वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला.

    त्यांच्या नेतृत्वाखाली नमो महाराष्ट्र व यवतमाळ मार्मिक या वृत्तपत्रांनी अल्पावधीतच वाचकांच्या मनात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व जनहिताच्या विषयांवर त्यांनी केलेले निर्भीड वृत्तांकन नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे.

    त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.


    सर आपणास यवतमाळ मार्मिक चे वणी प्रतिनिधी श्नी,संजय चिंचोलकर कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छा 





    Photo