विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वास्तूपर्क कॉलनीजवळील लालगुडा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आयोजित भव्य भजन संध्या कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विदर्भातील नामवंत कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने भक्तिमय वातावरण निर्माण करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळाही पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. पवनजी एकरे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वंदना ताई चामाटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल बोढाले उपस्थित होते. तसेच यवतमाळ जिल्हा भजन प्रमुख श्री. अनील गो. बोढाले आणि गायक गुरुवर्य श्री. संतोषजी मानकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात व. रा. तुकडोजी महाराज व सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इयत्ता दहावीमध्ये ९०.८० टक्के गुण मिळवणारी कु. लुकेश्री प्रशांत चौधरी तसेच इयत्ता बारावीमध्ये ७७ टक्के गुण प्राप्त करणारी कु. निकिता प्रमोद वाभीटकर या गुणवंत विद्यार्थिनींचा श्री. पवन एकरे व सौ. वंदना ताई चामाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात गायिका सीमाताई काळे (खैरी, वर्धा), मीनाक्षी खंडारे (दिंडोडा, वर्धा), नलिनी नक्षीने (चंद्रपूर), गायक संचिन पंधरे (झरी), अशोक मांडवकर (नांदेपेरा), तसेच तबलावादक शुभम बोबडे (वणी) आणि हार्मोनियम वादक विष्णू खुंटेमाटे (घुघूस) यांनी भजन व भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष श्री. शामदेवजी खाडे, रामनवमी उत्सव समिती लालगुडाचे अध्यक्ष सचिन मिलमिले, श्री. विठ्ठलजी गाडगे, श्री. चेतन वांढरे, श्री. राजीव झाडे, श्री. विजय झाडे, श्री. उमेश पिदूरकर, श्री. प्रशांत मिलमिले, श्री. प्रवीणजी वाघमारे, ओम डेकोरेशन तसेच श्री. अभिलाष राजूरकर (साऊंड) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रेयश फोटो स्टुडिओ व श्रेयश इलेक्ट्रिकल्स, ब्राम्हणी रोड वणी यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.



