विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : श्री छत्रपती शाहू महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), वणी येथे शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया ८० टक्के शासकीय कोटा व २० टक्के व्यवस्थापन कोट्याअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
संस्थेमध्ये यंदा विजतंत्री (Electrician) आणि यांत्रिक डिझेल (Mechanic Diesel) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी १० वी उत्तीर्ण पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
संस्थेची वैशिष्ट्ये पाहता अनुभवी शिक्षकवृंद, उत्कृष्ट निकालांची परंपरा, सुसज्ज कार्यशाळा, अद्ययावत आयटी कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय सुविधा, शासकीय शिष्यवृत्ती तसेच रोजगार व अप्रेंटिसशिपसाठी मार्गदर्शन अशा विविध सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
तसेच संस्थेचे स्वतंत्र प्रायोगिक परीक्षा केंद्र, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागाची संधी आणि क्रीडांगण यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ९४२२१६५३९४ व ९१५८५०३५०३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


