विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
चंद्रपूर : शिवसेनेचे चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख तथा आमदार कृपालजी तुमाने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी युवासेना चंद्रपूर लोकसभा अध्यक्ष विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी आमदार कृपालजी तुमाने यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, विकासाभिमुख नेतृत्व आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कृपालजी तुमाने यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार विक्रांत चचडा यांनी काढले.
"आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यात अधिक यश लाभो," अशा शब्दांत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
शुभेच्छुक : विक्रांत नंदकिशोर चचडा (युवासेना चंद्रपूर लोकसभा अध्यक्ष)


