विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शेतकरी चळवळ, विदर्भाच्या न्यायहक्कासाठीचा लढा आणि तत्त्वनिष्ठ राजकारण यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले माजी आमदार तथा ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. वामनराव चटप यांची भव्य आणि प्रेरणादायी महामुलाखत ABP माझाच्या लोकप्रिय “माझा कट्टा” या विशेष कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.
शेतकरी चळवळीतील तब्बल ४५ वर्षांच्या अखंड योगदानाची, संघर्षमय प्रवासाची आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाची प्रेरणादायी गाथा या मुलाखतीतून उलगडणार आहे. आजच्या बदलत्या राजकीय वातावरणातही तत्त्व आणि निष्ठा कायम ठेवून जनतेसाठी लढणाऱ्या एका खऱ्या योद्ध्याचा जीवनसंघर्ष या विशेष मुलाखतीतून पाहायला मिळणार आहे.
ही विशेष महामुलाखत दिनांक २३ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजता तसेच २४ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता प्रसारित होणार असून, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि राजकीय क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही मुलाखत मार्गदर्शक ठरणार आहे.
तत्त्व, संघर्ष आणि जनआंदोलनाचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही विशेष मुलाखत आवर्जून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



