ठळक बातम्या

    वणी पब्लिक स्कूलचा दहावीला १०० टक्के निकाल; अनुष्का गोहणे प्रथम

     वणी पब्लिक स्कूलचा दहावीला १०० टक्के निकाल; अनुष्का गोहणे प्रथम

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : येथील सर्वपरिचित वणी पब्लिक स्कूल ने यंदाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात नेत्रदीपक यश संपादन करत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

    यामध्ये कु. अनुष्का मंसराम गोहणे हिने ९२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. पलक धनराज रेवते हिने ८६.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर श्रेयस अशोक मांडवकर याने ८६.६० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला.

    विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाशजी चचडा, संचालक मंडळ सदस्य मा. विक्रांत चचडा तसेच प्राचार्य आष्लेषा जेनेकार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक व पालकांच्या परिश्रमामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

           दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे 

                      अभिनंदन... अभिनंदन... 



    Photo