ठळक बातम्या

    आषाढीच्या पर्वावर श्री विष्णु स्तोत्राणि प्रकाशित डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचा ९६ वा ग्रंथ

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : १ जानेवारी २०२० पासून सलग ३८१ दिवस प्रकाशित झालेली, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम स्वरूपात नोंदविण्यात आलेली दैनिक हिंदुस्थान मध्ये प्रकाशित विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड लिखित विक्रमी मालिका म्हणजे श्री शांकर स्तोत्र रसावली.

             भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज विरचित विविध स्तोत्रांवर आधारित या लेखमालिकेमध्ये   प्रकाशित श्रीगणेश, श्री शिव तथा श्री देवी स्तोत्रांवरील संकलनांची पुस्तके यापूर्वीच प्रकाशित झालेली आहेत. 

          या मालिकेतील भगवान श्री विष्णूंवर लिहिलेल्या श्रीविष्णू भुजंगप्रयात, श्री हरी स्तुती आणि श्रीविष्णु पादादिकेशांतस्तुती  या तीन स्तोत्रांच्या १०२ श्लोकांवरील   निरूपणाचा हा संग्रह अविरत प्रकाशन जळगावच्या द्वारे आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रकाशित होत आहे. 

           या निमित्ताने ही संपूर्ण मालिका आता चार ग्रंथ रूपात प्रकाशित झालेली आहे ही गोष्ट अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारतीय संस्कृतीच्या सर्व प्रेमी व्यक्तींनी या ग्रंथाचा जरूर आस्वाद घ्यावा असे आवाहन अविरत प्रकाशनच्या द्वारे करण्यात येत आहे. 


    श्री विष्णु स्तोत्राणि 

    डॉ. स्वानंद गजानन पुंड

    अविरत प्रकाशन जळगाव 

    90288 68953

    पृष्ठ संख्या १३०

    मूल्य टपाल खर्चासह २४०

    Photo