विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी : क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान, नागपूर यांच्या वतीने वणी शहरातील प्रभाग क्रमांक २ येथे शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी निःशुल्क आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जनता शाळा वणी येथे आयोजित करण्यात आले असून नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या शिबिरात नागरिकांची शारीरिक तपासणी, आयुर्वेदिक उपचार, रक्त तपासणी (HB व Sugar) तसेच आरोग्यविषयक बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच गरजू नागरिकांना निःशुल्क आयुर्वेदिक औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये मालिश तेल व आयुर्वेदिक टॉनिक यांचा समावेश आहे.
महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका प्रभाग क्रमांक २ सौ. रिता महेश पहापळे यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निःशुल्क आयुर्वेदिक आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिराचे ठिकाण : जनता शाळा प्रभाग क्रमांक २, वणी
दिनांक : शनिवार, २२ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत समावेश आहे.

