ठळक बातम्या

    तात्याजी पाटील पावडे यांची ‘आत्मा’ समितीच्या अध्यक्षपदी निवड

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत वणी तालुका शेतकरी सल्ला समितीच्या (BFAC) अध्यक्षपदी सरपंच व शेतकरी तात्याजी पाटील पावडे यांची नुकतीच निवड झाली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.

    शेतकऱ्यांचे प्रश्न, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शासनाच्या कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील शेतीविषयक उपक्रमांना आणि शेतकरी सक्षमीकरणाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी पावडे यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत केले.



    Photo