विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: शिक्षक कसा असावा याचा उत्तम आदर्श म्हणजे गजानन कासावार होत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं कार्य हे अनुकरणीय आहे. ते केवळ पुस्तकी ज्ञान देणारे शिक्षक नाहीत. तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावणारे खरे मार्गदर्शक आहेत. असे गौरवोद्गार माजी केंद्रिय मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी काढलेत. नगर परिषद शाळा क्रमांक सातचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून गजानन कासावार सेवानिवृत्त झालेत. त्या निमित्त आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात अहीर बोलत होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान आमदार संजय देरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार वामनराव कासावार, तालुका संघचालक हरिहर भागवत, वणी नगरपालिकेच्या अध्यक्ष विद्या आत्राम, मनसे पक्षनेते राजू उंबरकर, यवतमाळ अर्बन बँकेचे नितीन खर्चे, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संजय देरकर यांनी कासावार यांच्या अविरत कार्याचा गौरव केला. त्यांचे साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी


